आशियाई अरबी संस्कृतींच्या अवमानाची, उपेक्षेची करुण कहाणी म्हणजे कतारचा वर्ल्ड कप होता...
जगभरातील वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर कतार वर्ल्ड कपविषयी अनेक वेळा अनाठायी आकस दिसून आला. परंतु, सारासार विचार करता, फिफा ही फुटबॉलची धनदांडगी संस्था आणि तिची आर्थिक, राजकीय ताकद आणि त्यामुळे घडवून आणलेला भू-राजकीय वाद, तसेच त्यामुळे निर्माण झालेले राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक भेदाभेदाचे पर्यावरण, याची पाश्चिमात्य नजरेतून प्रस्तृत झालेली सुरस आणि चमत्कारिक कथा म्हणजे कतारचा वर्ल्ड कप होता, असे म्हणता येईल.......